INFORMATION ABOUT PURIFIED WATER
पाणी शुद्धीकरणाविषयी माहिती
पृथ्वीवरील जमीन पाणी प्रमाण :- पाणी ७१%,जमीन २९%
*७१% पैकी फक्त ३% पाणीच पिण्यास योग्य आहे. माणवाच्या शरीर वजनाच्या ६० % वजन हे पाण्याचे असते. पेशी जिवंत ठेवणे,शरीरातील द्रवपदार्थांचे वहन,अन्नाचे चयापचय ,शरीराचे तापमान थंड ठेवणे ,उत्सर्जन ही पाण्याची प्रमुख कार्ये होत.*
सुरक्षित पिण्याचे पाणी :- पाण्यात रोगजंतू नसावेत. दिसण्यास स्वच्छ (रंगहीन,पारदर्शक,गढूळ नको) खारट नसावे(क्षार नसावे ),दुर्गंधी नको,बेचव नको,अपायकारक घटक नको,रसायनीक प्रदूषकांपासून दूर असे पाणी असावे.
पाण्याचे मोजमाप
गोल विहिरीचे सूत्र:- व्यासाचा वर्ग * पाण्याची खोली * ७८५-एकूण लिटर पाणी (सर्व मापे मीटरमध्ये)
चौकोनी विहीर / टाकीचे सूत्र :- लांबी * रुंदी * पाण्याची खोली (उंची) * १००० = एकून लिटर पाणी (सर्व मापे मीटरमध्ये )
पाण्याचे शुद्धीकरण : 1000 लीटर पाण्यासाठी 5 ग्रॅम T.C.L. पाउडरचा वापर करणे.
हापशाचे शुद्धीकरण
4 इंची व्यासाचा हापसा – 500 ml (1/2 लीटर) पाण्यात 150 ग्रॅम TCL पावडर घेऊन करतात.6 इंची व्यासाचा हापसा – 1 लीटर पाण्यामध्ये300 ग्रॅम TCL पावडर घेऊन करतात.
मदर सोल्यूशन 1 लीटर पाण्यामध्ये 200 ग्रॅम TCL पावडर घेऊन करतात.
T.C.L. पावडर
सूत्र - CaOCI2
सध्या TCL पावडरच सार्वजनिक पाणी शुद्धीकरणासाठी वापरला जातो.
टी.सी.एल. पावडरलाच ब्लिचिंग पावडर असे म्हणतात.
TCL पावडरचे प्रकार
ग्रेड – I – यात 36% क्लोरीनचे प्रमाण असते.
ग्रेड – II – यात 33% क्लोरीनचे प्रमाण असते.
नेहमी किमान 33% क्लोरीनयुक्त TCL पावडर पाणी शुद्धीकरणासाठी वापरतात. कमीतकमी 20% क्लोरीन असलेली पावडरसुद्धा चालते.
चाचणी (test )
लॉगफॉर्म – ऑथोर्टोल्युडीन
पाण्यामध्ये मुक्त क्लोरीन आहे किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी करतात.
पाणी शुद्ध केल्यानंतर अर्ध्या तासाने O.T. घेण्यात यावी. (30 मिनिटे.)
पाण्यामध्ये 0.2 ते 0.5 पी.पी.एम. एवढी O.T. येणे आवश्यक असते.
TCL युक्त पाण्याची द्रावण टाकून चाचणी घेतली असता परीक्षा नळीतील पाण्याला 'पिवळा/ तपकिरी रंग' येतो.
पाण्यामध्ये TCL पावडर जास्त पडल्यास तपकिरी/लाल रंग येतो.
साधारण: पाण्यामध्ये 6 ते 8 तास O.T. टिकते.
धन्यवाद